सटाणा शहरातील सीआरपीएफ जवान जम्मू काश्मीरमधील चकमकीत जखमी
Featured

सटाणा शहरातील सीआरपीएफ जवान जम्मू काश्मीरमधील चकमकीत जखमी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

डांगसौंदाणे | वार्ताहर 

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील सीआरपीएफ जवान जावेद अहमद अमन शेख (वय 40) रा. सटाणा  हे जम्मू काश्मीर मधील सोपोर येथे कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत जखमी झाले आहेत.

त्यांच्या हाताच्या दंडा ला गोळी लागली असल्याचे समजते. या हल्यात त्यांचे अन्य तिघे साथीदार शहिद झालेआहेत. तर दोन सहकारी जखमी झाल्याची माहिती शेख कुटूबियांनी दिली आहे.

जावेद यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबतची माहिती जावेद यांचे बंधु वनकर्मचारी एजाज शेख यांनी दिली आहे. जावेद शेख हे सटाणा शहरातील मेट्रो खानावळचे संचालक अहमद शेख यांचे सुपुत्र आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com