Featured

नंदुरबार जिल्ह्यातील पालिका सभापतींची निवड जाहीर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार | प्रतिनिधी-

जिल्ह्यातील नंदुरबार तळोदा व नवापूर नगरपालिकेच्या विवीध विषय समिती सभापतींची आज बिनविरोध निवड करण्यात  आली.

नंदुरबार येथील पालिकेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. बांधकाम सभापतीपदी दीपक दिघे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण सभापतीपदी ज्योती पाटील, पाणी पुरवठा सभापतीपदी कैलास पाटील तर आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदाबाई ढंडोरे यांची निवड करण्यात आली आहे.

येथील पालिकेच्या विविध विषय समिती सभापतींची आज निवड करण्यात आली. सर्व नगरसेवकांना सभापतीपदाची संधी मिळावी यासाठी येथील पालिकेत दरवर्षी नवीन विषय समिती सभापतींची निवड करण्यात येते. त्यामुळे गतवर्षीच्या सर्व सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आज नवीन सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा सौ. भारती राजपूत, मुख्याधिकारी भीमराव बिक्कड उपस्थित होते. पाच विषय समितीच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने  सर्व सभापतींची बिनविरोध निवड झाली. यात बांधकाम सभापतीपदी दीपक प्रभाकर दिघे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण सभापतीपदी ज्योती पाटील, पाणीपुरवठा सभापतीपदी कैलास पाटील, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदाबाई प्रकाश ढंढोरे आणि स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी व नियोजन सभापतीपदी| उपनगराध्यक्षा भारती अशोक राजपूत यांची निवड झाली.

नुतन पदाधिकार्‍यांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी अभिनंदन केले.

तळोदा

मोदलपाडा, ता.तळोदा | वार्ताहर-

तळोदा पालिकेच्या विषय समित्यांची निवड आज तहसीलदार पंकज लोखंडे, मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत करण्यात आली.

स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष अजय परदेशी तर सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी रामानंद शिरीषकुमार ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सौ.शोभाबाई जालंधर भोई, हेमलाल पुरुषोत्तम मगरे, सौ. अनिता संदीप परदेशी,  हितेंद्र सरवणसिंह क्षत्रिय यांची निवड करण्यात आली.

स्वछता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी  योगेश प्रल्हाद पाडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यात सदस्य म्हणून सुरेश महादू पाडवी, सौ.सविता नितीन पाडवी, संजय बबनराव माळी, सुभाष धोंडू चौधरी यांची निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलविस्तारण समिती सभापतीपदी शेख अमानोद्दीन फकरोद्दीन शेख यांनी निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून भास्कर दत्तू मराठे, सयना अनुपकुमार उदासी, सुभाष धोंडू चौधरी, गौरव देवेंद्रलाल वाणी यांची निवड करण्यात आली.

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. अंबिका राहुल शेंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सौ.बेबीबाई हिरालाल पाडवी, सौ.सयना अनुपकुमार उदासी, सौ.अनिता संदीप परदेशी, सौ.कल्पना सतीवान पाडवी यांची निवड झाली.

नियोजन विकास समितीमध्ये सभापतीपदी सौ .भाग्यश्री योगेश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून हेमलाल पुरुषोत्तम मगरे, भास्कर दत्तू मराठे, संजय बबनराव माळी, गौरव देवेंद्र वाणी यांची निवड झाली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे, अश्विन परदेशी, लिपिक नितीन शिरसाठ, मोहन सूर्यवंशी, व कर्मचारी उपस्थित होते.

नवापूर

नवापूर | श.प्र.-

नवापूर पालिकेच्या विषय समित्यांची निवड आज निवडणुक निर्णय अधिकारी सुनिता जर्‍हाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थित पार पडली.

सकाळी ९ ते ११ वाजेपर्यत नामनिर्दशन पत्र भरण्याची प्रक्रिया पार पडली. यानंतर ११ वाजेपासून सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. एकुण प्राप्त झालेल्या चारही नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले. माघारीसाठी १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला. माघारीच्या कालावधीत एकही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने व ४ समितीच्या सभापती निवडीसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त असल्याने पिठासीन अधिकारी सुनिता जर्‍हाड यांनी चारही समितीच्या सभापतीपदी अनुक्रमे बांधकाम समिती सभापती हारुन शबीर खाटीक, आरोग्य सभापती राष्ट्रवादीचे खलील रज्जाक खाटीक, पाणीपुरवठा व जलनिसारन समितीसाठी रेणुका विनय गावीत, महिला व बाल कल्याण सभापती मंजु मुकेश गावीत यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

या संपुर्ण निवड प्रक्रियेमध्ये न.पा प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील, अशोक साबळे यांनी काम पाहिले. निवडून आलेल्या सर्व विषय समितीच्या सभापती यांचा सत्कार पीठासीन अधिकारी सुनिता जर्‍हाड, नगराध्यक्षा हेमलता पाटील व उपनगराध्यक्षा सुरैय्याबी शहा, मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व नगरसेवकांनी केला.नियोजन समिती उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने तसेच गटनेते यांनी समिती सदस्याचे  नावे  न दिल्याने समितीची रचना करता आलेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com