Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा लोकसभेत

नगर-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा लोकसभेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-करमाळा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व लष्करी आस्थापनेचे भूसंपादन तातडीने करण्याची आग्रही मागणी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत केली.

लोकसभेच्या शीतकालीन सत्रात रस्ते विकास मंत्रालय व रक्षा मंत्रालय यांच्याकडे आग्रह धरत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. अहमदनगर-करमाळा-सोलापूर हायवेच्या चौपदरीकरणाविषयीचा मुद्दा खासदार विखे पाटील यांनी लोकसभेत उपस्थित करुन या प्रश्नाकडे सभागृह लक्ष वेधले. अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हायवे सुरक्षा विभागाच्या हद्दीत येतो. भारतमाला योजनेअंतर्गत होणार्‍या या महामार्गाच्या 143 किमी अंतराच्या कामांसाठी सुरक्षा विभागाच्या हद्दीत येणारी 1.60 हेक्टर जमीन व शाळा तसेच आर्मड कॉर्प हद्दीत येणारी 3.5 हेक्टर जमीन लवकरात लवकर संपादित करण्याची विनंती सरकारच्या माध्यमातून सुरक्षा विभागाला केली.

- Advertisement -

गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून स्थानिक नागरिकांना यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्वरित भूसंपादन प्रकिया सुरु केल्यास, संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यास सहकार्य होईल, असे विखे पाटील म्हणाले.

बीएसएनएल थकीत वीज बिल संदर्भातही खा. डॉ. विखे पाटील यांनी लक्ष वेधले. अहमदनगर जिल्ह्याचे बीएसएनएलचे वीजबिल थकलेले आहे व या थकबाकी कोटी महावितरणकडून कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा बाधित होण्याची शक्यता आहे. बीएसएनएलच्या संदर्भात केंद्र सरकारच्या दीर्घकालीन धोरणाबाबत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या