नगर, संगमनेर, राहात्यात रविवारी आणखी 7 पॉझिटिव्ह

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत

जिल्ह्याचा आकडा 258 : अ‍ॅक्टिव्ह केसेस 49

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी सकाळीच आणखी सात करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात नगर शहरातील चार, संगमनेरमधील दोन आणि राहाता तालुक्यातील एका 13 वर्षीय मुलाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 258 वर पोहचला असून जिल्ह्यात रविवारी रात्रीपर्यंत 49 अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील करोना तपासणी प्रयोग शाळेतून आणखी सात व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात नगर शहरातील कल्याण रोड येथील 55 वर्षीय महिला करोनाबाधित आढळली. तर केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षांचा मुलगाही बाधित झाला आहे. केडगावमधील 29 वर्षीय बाधित व्यक्ती येथील एका रुग्णालयाचा कर्मचारी आहे.

यासह राहाता तालुक्यातील खंडोबा चौक येथील तेरा वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील तीस वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या 24 वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात रविवारी रात्रीपर्यंत बाधितांची संख्या 258 वर पोहचली आहे.

14 दिवसांत 106 नवीन रुग्ण
जिल्ह्यात मुंबई-पुण्याच्या पाहुण्यांमुळे 1 जून ते 14 जून या 14 दिवसांच्या कालावधीत नव्याने 106 रुग्ण समोर आले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींमुळे जिल्ह्याचा आकडा 258 पर्यंत पोहचला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *