प्रियकराच्या भावाचा खून
Featured

प्रियकराच्या भावाचा खून

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

दीपक बरकसे
वैजापूर –  मुलीला पळविल्याचे कारणावरून पित्यासह चुलत्याने प्रियकराच्या अल्पवयीन भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील लाखखंडाळा येथे शनिवार (ता.14) मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. रोहिदास छगन देवकर व देवीदास छगन देवकर, रा.लाख खंडाळा असे दोन्ही आरोपींची नावे आहेत. भीमराज बाळासाहेब गायकवाड (17), रा.लाख खंडाळा असे हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखखंडाळा येथे बाळासाहेब गायकवाड हे पत्नी व दोन्ही मुलांसह शेतवस्तीवर राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा अमोल गायकवाड हा कामासाठी चाललो म्हणून घरातून बाहेर पडला. मात्र तो घरी परत न आल्याने त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. तो मिळून न आल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसात कळविली. शेजारीच शेतवस्तीवरील मुलगी घरातून बेपत्ता असल्याची माहिती गायकवाड कुटुंबियांना होती. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाळासाहेब गायकवाड व त्यांची पत्नी अलका हे दोघे घरासमोर बसलेले होते तर लहान मुलगा भीमराज हा घरात झोपलेला होता. यावेळी त्याठिकाणी रोहिदास देवकर व देवीदास देवकर हे दोघे त्याठिकाणी आले. यावेळी तुम्ही इकडे कसे काय आलात ? अशी विचारणा बाळासाहेब यांनी त्यांना केली. मात्र काही समजण्याचे अगोदरच देवकर बंधूंनी बाळासाहेब यांच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केला. यावेळी अलका यांनी पतीला वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यावरही दोघांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. याअवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाळासाहेब हे पत्नीसह त्यांचे मोठे भाऊ दादासाहेब गायकवाड यांच्या घराकडे पळाले. त्यांचा भाऊ व पुतण्यांनी त्यांना उपचारसाठी वैजापूर येथे रुग्णालयात आणले. दरम्यान, याचवेळी घरात झोपलेला त्यांचा लहान मुलगा भीमराज याचा देवीदास व रोहीदास या दोघांनी खून केल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी अलका बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास छगन देवकर व रोहिदास छगन देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनासह अस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलीसांंनी शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

‘सैराट’प्रमाणेच हत्या…
सैराट चित्रपटात दाखवलेल्या हत्येसारखाच प्रकार वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथे घडला. प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका तरुणीच्या वडिलांनी ुधारदार शस्त्राने वार करत मुलीच्या प्रियकरच्या लहान भावाचा खून केला. तर त्याच्या आई वडिलास मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या दोन हल्लेखोरला वैजापूर पोलिसांनी चार तासांत अटक केली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून लाख खंडाळा परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com