file photo
file photo
Featured

मुळा धरणातून उन्हाळी आवर्तन

Dhananjay Shinde

नेवासा (तालुका प्रतिनिधी) — मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज सकाळी 6 वाजता 700 क्यूसेकसने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
पालक मंत्री हसन मुश्रीफ,जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांचे सोबत  चर्चा होऊन मुळा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन  20 मार्च 2020  सोडण्याचे ठरले होते.त्यानुसार शुक्रवार दि 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उजव्या कालव्यातून 700 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी ते 1000  क्यूसेकस तर उद्या शनिवारी 1500 क्युसेकसपर्यंत आवर्तन वाढविणार.
आवर्तना दरम्यान कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही मुळा पाटबंधारे प्रशासनाने दिला आहे.पाणी चोरी रोखण्यासाठी आवर्तन काळात 10   दिवस विद्युत् पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
दरम्यान विहिरी व बोअर ची पाणी पातळी घटल्याने शेतात उभी असलेली पिके अडचणीत आली होती त्यामुळे हे आवर्तन कधी सुटते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून होते.आवर्तन सुटल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिला मिळाला आहे.
Deshdoot
www.deshdoot.com