कोरोना : मुक्ताईनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना : मुक्ताईनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

 जनतेने घरातच राहून शासनाला सहकार्य करावे – आ. चंद्रकांत पाटील

कोरोना पासून बचाव करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुक्ताईनगर शहरात जमावबंदीच्या आदेशाची अवहेलना केल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जनतेने घरात राहून कोरोना हरवण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जमावबंदी व संचारबंदी असतानाही या नियमांचे पालन न करता त्यांची अवहेलना केल्यामुळे मुक्ताईनगर येथील सौ. भावना गोसावी, सुरेश गोसावी व जितेंद्र गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश आमोदकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार सादिक पटवे हे करीत आहेत. दरम्यान मुक्ताईनगर शहरात जीवनाश्यक वस्तू सोशल डिस्टन्स ठेवूनच खरेदी कराव्यात त्यासाठी दुकानांसमोर मोठी गर्दी करू नये .

कोरोना सारख्या महाभयंकर राष्ट्रीय आपत्तीस आपण सर्वांनी मिळून तोंड देऊ या त्यासाठी प्रत्येकाने आपली तसेच कुटुंबीयांची आरोग्य विभागातर्फे सुचविण्यात आलेल्या सूचनांनुसार स्वच्छता पाहून काळजी घ्यावी व सुरक्षित रहावे काही महत्वाचे काम नसल्यास त्यासाठी घरातच राहून शासनास मदत करावी असे आवाहन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दैनिक देशदूतशी बोलताना केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com