महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण; नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
Featured

महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण; नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांना वीज दुरुस्तीचे काम करीत असताना नगरसेवकाने शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महावितरणचे एमआयडीसी ऑफिस श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 30 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बाजारतळ वरील सर्कल जवळील काळे मेडिकल स्टोअरजवळ इलेक्ट्रिक पोलचे काम करीत होतो. नगरसेवक दीपक चव्हाण यांनी आपणाला शिवीगाळ केली व गचांडी पकडून तोंडात चार-पाच चापटी मारून काम करत असताना अडथळा केला तसेच गर्दीतील तीन लोकांनी शिवीगाळ केली. त्यावरून श्रीरामपूर पोलिसानी नगरसेवक चव्हाण यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि 353, 332, 504 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई उजे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com