Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबहुचर्चित पोको एक्स २ स्मार्टफोन आकर्षक ऑफर्ससह आजपासून विक्रीसाठी उपलब्ध

बहुचर्चित पोको एक्स २ स्मार्टफोन आकर्षक ऑफर्ससह आजपासून विक्रीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली :

भारतात काही दिवसांपूर्वीच पोको एक्स २ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या विक्रीसाठी ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर १२ वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. पोको एक्स २ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर असून हा फोन खास गेमिंगसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

- Advertisement -

दमदार प्रोसेसर सह 6.67 इंच फुल एचडी + रिअलिटी फ्लो 120Hz डिस्प्लेमुळे गेमिंगचा दर्जेदार अनुभव मिळतो. फोनच्या 3डी कर्व्ड बॅक डिझाइनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. पोको एक्स २ भारतात तीन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

अँड्रॉइड 10 ओएसवर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रैगन 730G प्रोसेसर अड्रेनो 618 जीपीयु आणि 8 जीबीपर्यंत एल पीडीडीआर4एक्स रॅम आहे. पोकोचा हा स्मार्टफोन रिअर क्वॉड कॅमेरा सेटअपसोबत येतो. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे, तर 2+8+2 मेगापिक्सलचे अन्य तीन सेंसर आहेत. स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील 20 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि आयआर ब्लास्टर आहे. या फोनला लेटेस्ट अँड्रॉइड 11 चे अपडेटही मिळेल असंही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय 4,500mAh ची बॅटरी फोनमध्ये असून 68 मिनिटांमध्ये 0 ते 100 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. पोको एक्स २ हा फोन आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयद्वारे खरेदी केल्यास 1000 रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय अँँक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे अतिरिक्त 5 टक्के सवलतही मिळेल. अँँटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

या फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय टॉप व्हेरिअंट म्हणजे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या