राज्यात शनिवारी येणार मान्सून
Featured

राज्यात शनिवारी येणार मान्सून

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – सध्याची पोषक स्थिती पाहता येत्या शनिवारीच(6 जून) महाराष्ट्र आणि गोव्यात मान्सूनचे आगमन होईल अशी माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली.

अरबी समुद्रातील कमी दाबातून निर्माण होत असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेही मान्सूनचा महाराष्ट्र व गोवा प्रवास गतिमान होणार आहे. आगामी तीन दिवस दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, असे हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक राहुल मोहन यांनी सांगितले.

मान्सूनची सध्याची गती लक्षात घेता, उद्या बुधवारपर्यंत संपूर्ण केरळ त्याच्या कवेत असेल आणि त्यानंतर कर्नाटकाचा भाग व्यापून ते महाराष्ट्राच्या दिशेने कूच करेल. निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे त्याला गती मिळणार असल्याने येत्या शनिवारी मान्सून महाराष्ट्र आणि गोव्यात दाखल होईल, असे ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com