Friday, April 26, 2024
Homeनगरनगरचे राजकारण सोपे नाही

नगरचे राजकारण सोपे नाही

आमदार रोहित पवार यांची स्पष्टोक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरचे राजकारण एवढे सोपे नाही. मी ते जवळून पाहिले आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी आ. पवार नगरला आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीची बैठक मंगळवारी नगरमध्ये पार पडली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, करण ससाणे, क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझी राजकारणात सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे. नगरचे राजकारण सोपे नाही हे मी जवळून पाहिले आहे. पण मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येथील लोकांनी समजून घेतलं, मला स्वीकारलं, हा माझ्यासाठी मोठा अभिमान आहे .त्यामुळे आगामी काळामध्ये मागे काय झालं याच्या फंदात पडायचे नाही आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचे व विकास कामे करायची यासाठी नियोजन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

माळीवाडा बसस्थानकाची पाहणी
आ. रोहित पवार यांनी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यासोबत मंगळवारी दुपारी माळीवाडा बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांना नगरची प्रसिध्द बाबासाहेबांची भेळ खाण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर त्यांनी माळीवाडा एसटी स्थानक प्रमुखांशी विविध विषयांवर चर्चा करत, बसस्थानकाच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. या दरम्यान, त्यांनी प्रवाश्यांशी थेट संवाद साधला. आ. पवार यांच्यासोबत मोठ्या संख्येने तरूणांनी सेल्फी काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या