Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनाही मदत – जयंत पाटील

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनाही मदत – जयंत पाटील

पुणे – दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनाही मदत करेल. असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्यात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा यामध्ये विचार करण्यात आला नव्हता, त्यामुळे ही शेतकरी कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांंकडून होऊ लागला आहे. यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

- Advertisement -

ते म्हणाले, दोन लाखांच्या आत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि 2 लाखांपुढे कर्ज असणार्‍यांचा आम्ही वेगळा विचार करत आहोत. राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे इतर नेते त्यासाठी विचार करत आहेत. तसेच ज्या शेतकर्‍यांनी नियमित कर्जफेड केली आहे, अशा शेतकर्‍यांसाठी आम्ही एक योजना आणणार आहोत.

तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या, त्यांनी घेतलेले एकूण कर्ज, आणि त्यावरील व्याजाची माहिती आम्ही गोळा करत आहोत. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे, आमचं सरकार त्यांनादेखील न्याय देईल. शेतकर्‍यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत, याचीदेखील काळजी घेतली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या