महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबईतील ६९ जणांना शहिदांचा दर्जा द्यावा- मंत्री सुभाष देसाई
Featured

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबईतील ६९ जणांना शहिदांचा दर्जा द्यावा- मंत्री सुभाष देसाई

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

मुंबई:

महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या मुंबईतील ६९ जणांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी शिवसेनेचे नेते तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बेळगाव प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनादरम्यान १९६९ मध्ये मुंबईत ६९ जण शहिद झाले होते.

शासनाने त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सवलती व योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com