केंद्राच्या पॅकेजमधे केवळ मोठ-मोठे आकडे : अजित पवार
Featured

केंद्राच्या पॅकेजमधे केवळ मोठ-मोठे आकडे : अजित पवार

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) –  केंद्र सरकारने 21 लाख कोटीचे पॅकेज दिले. त्यातून वेगवेगळ्या राज्यातील जनतेच्या हातामध्ये किती पैसा जाणार आहे. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. केवळ मोठ-मोठे आकडे पहायला मिळाले, असे सांगत अजित पवार यानी भाजपावर निशना साधला.

पिंपळे सौदागर येथील पुलाचे उद्धघाटना नंतर ते बोलत होते. ते म्हणाले, गरीब माणूस दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते या चिंतेत असतो. अशा माणसाला ख-या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी आमच्या परीने आम्ही केंद्राकडे मागणी करत आहोत. वेगवेगळा पत्रव्यवहार केंद्राकडे केला आहे. व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. त्यावेळेसही या मागण्या केल्या आहेत.

महाराष्टातून खूप मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग बाहेर जात आहे. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान भागात कामगार गेला आहे. त्यांची वाट बघत असताना आपल्या राज्यात जिथे मागासलेला भाग आहे. तिथल्या गरीब वर्गाने काम मिळविण्याचा प्रयत्न करावा. कामगाराला काही कौशल्य द्यायचे असेल. तर, राज्य सरकार देईल. परंतु, राज्यातील मजूरालाच कसे काम मिळेल. ते कटाक्षाने पाहिले जाईल. कामगार काम करायला तयार झाला. तर, राज्यातील बेरोजगाराला चांगल्या प्रकारे संसार चालविण्यासाठी मदत होईल, असेही ते म्हणाले.

करोना आटोक्यात येण्यासाठी राज्य सरकाराचे सर्वोतोपरी प्रयत्न
पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची करोनासंदर्भातील आम्ही माहिती घेत असतो. जादा अधिकारी दिले आहेत. करोना आटोक्यात येण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात करोनाचे प्रमाण कमी दिसत होते. परंतु, अलिकडच्या काळात शहरातील नागरिक गावांमध्ये जायला लागल्याचे प्रमाण वाढल्यापासून ग्रामीणभागातही रुग्ण संख्या वाढायला लागली आहे. परंतु, रुग्ण संख्या वाढत असली. तरीही खबरदारी घेतल्यास घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
देशात चौथा लॉकडाउन आहे. लॉकडाउन वाढविण्याबाबत भारत सरकार काय निर्णय घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून येकला मिळेल. पण, लॉकडाउनबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यावरच देतील असा माझा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.

राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून नोकर्‍या, व्यवसाय, व्यवहार बंद आहेत. सगळे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढायचा आहे. त्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. मंत्रिमंडळात त्याबाबतचा लवकरच निर्णय होईल, असे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

करोनाला आपण निश्चितच हरवू
संपूर्ण राज्य करोनाफ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठींबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रूमला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी आज घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला.
करोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. योग्य काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल, मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Deshdoot
www.deshdoot.com