मुंबई : लॉकडाऊन वाढल्यामुळे शेकडो परप्रांतीय मजूरांचा ठिय्या
Featured

मुंबई : लॉकडाऊन वाढल्यामुळे शेकडो परप्रांतीय मजूरांचा ठिय्या

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच मुंबईच्या वांद्रे स्टेशनबाहेरील परिसरामध्ये शेकडोंच्या सृंख्येने परप्रांतीय मजूर जमा झाले व ठिय्या देवून मजूरांनी ‘गावाला जाण्याची परवानगी द्यावी’ अशी मागणी केली.

लॉकडाऊनमुळे गेल्या 21 दिवसांपासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे कुणालाही घराबाहेर पडता आलेलं नाही. त्यामुळे गावोगावचे मजूर या ठिकाणी अडकले आहेत. आसपासच्या कारखाने आणि कंपन्यांमध्ये हे कामगार काम करतात. यातले बहुतांश मजूर हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या भागातले होते. या कामगारांना इथे स्वत:चं असं घर नाही. त्यामुळे आता राहायचं कुठे? असा प्रश्न या मजुरांनी विचारला. आमच्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडावी अशी मागणीही केली.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची मोठी कुमक तातडीने घटनास्थळी हजर झाली. सर्वांची राहण्याची, खाण्याची सोय राज्य सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन देवून त्यांना परत आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलं.

Deshdoot
www.deshdoot.com