Featured

बाबांनो, जीव महत्त्वाचा की 500 रुपये ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पैसे काढण्यासाठी बँकेत तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

देश कोरोनाच्या महासंकटात सापडला आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन देशात लॉकडाऊन आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन पंतप्रधान व मुख्यमंत्री वारंवार करीत आहेत. त्यानंतरही आम्ही भारतीय ऐकायला तयार नाहीत. ज्या विषाणूपुढे जागतिक महासत्ता बेजार झाल्या आहेत, त्यासाठी घरात राहणे हा एकच उपाय आहे.

मात्र, बँकेत किंवा बाजार समित्यांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाऊनचा फज्जा उडत आहे. ‘जमात’च्या लोकांनी केले, त्याची पुनरावृत्ती आता नको आहे. बँकांतील गर्दी अवघे जन-धनचे 500 रुपये मिळविण्यासाठी आहे. 500 रुपयांसाठी जनता जिवाशी खेळत आहे. बाबांनो, जीव महत्त्वाचा की 500 रूपये?

कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने शासनाकडून वारंवार घरात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. एकीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाकडे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे. खिशात पैसेच नसल्याने नाईलाजाने बँकेत रांगेत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.पण शासन आणि सामाजिक संस्था आपले अथक प्रयत्न करीत आहे. कोणीही भुकेला राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

500 रुपये तुमच्या खात्यातच राहणार नाही. त्यासाठी गर्दी करुन जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन बँकेतील अधिकारीही आता करत आहे.
सोशल डिस्टन्सिंगसाठी बँक व्यवस्थापनाने ठरावीक राहण्यासाठी आखणी केली आहे. परंतु नागरिक नंबर लागण्याच्या प्रयत्नात सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत.

आपण सर्व आज जीवनाच्या अशा वळणावर आहोत की, उद्याच्या भविष्यात काय वाढून ठेवल आहे, त्याची कल्पना करताना इतर देशात विशेषत: अमेरिकेत सध्या जे काही घडत आहे त्याच्यावरून काळजाचे ठोके चुकावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनाच्या या महाभयंकर विळख्यातून सही सलामत सुटल्यावर आपणास प्रतिबंधात्मक अशी जर सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट करावी लागेल तर ती आहे सोशल डिस्टन्सिंग पाळणे होय.

सर्वांनी मिळून मनावर घेतले आणि एकजूट दाखविली की, आज ज्याप्रमाणे कोरोनाच्या भीतीने संपूर्ण भारताने एकजूट दाखवत जनता ‘कर्फ्यू’ यशस्वी केला तसाच सोशल डिस्टन्सिंगचा नियम मनावर घेतला आणि देशात कोरोना हरविल्याचे धाडस दाखवले तरच आपण भविष्यात पुढे वाढून ठेवलेल्या समस्यांचा सक्षमपणे सामना करू शकू. नाहीतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन करीत राहणार. या बेपर्वाईमुळे कोरोना संसर्गाची भीती अधिकच वाढणार आहे. यात तीळमात्र शंका नाही.

Deshdoot
www.deshdoot.com