Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसावधान – सुशांत सिंहचे “ते” फोटोज् फॉरवर्ड कराल तर…

सावधान – सुशांत सिंहचे “ते” फोटोज् फॉरवर्ड कराल तर…

मुंबई – प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या गळ्याला दोरीचे व्रण असलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने ट्विट करत म्हंटले आहे, “सोशल मीडियावर एक ट्रेंड होतोय. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. असे फोटो पसरवणं न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असून जर कुणी असे फोटो शेअर केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.” असा ईशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या