जनतेला विनाकारण त्रास देणारे आधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करू : खा. विखे

jalgaon-digital
2 Min Read

कर्जत (प्रतिनीधी) – जनतेला विनाकारण त्रास देणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना निलंबित करू असा इशारा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे आयोजित बैठकीत दिला. यावेळी प्रांतआधिकारी अर्चना नष्टे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबदास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, बाळासाहेब जगताप, तालुका अध्यक्ष डॉ. सुनील गावडे, तहसीलदार छगन वाघ, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर शांतिलाल कोपनर, दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, बापुराव गायकवाड, रासप महिला अघाडीच्या तालुका अध्यक्षा मनीषा हुलगुडे, हाके मेजर, सावन शेटे, बाळासाहेब देशमुख, राम शेटे, दिग्वविजय देशमुख व गटविकास आधिकारी, बांधकाम विभागचे सी. एम. पवार, श्री. बागुल, श्री. कानगुडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. विखे म्हणाले कि खासदार आपल्या दारी ही एक वेगळी व नवीन संकल्पना आपण राबवत आहोत. यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आधिका-यांच्या समवेत जनतेची एकत्र बैठक घेत आहोत. यामध्ये गोरगरीब जनतेची अडवून राहिलेले सार्वजनिक किंवा वैयक्तिक प्रश्न सुटत आहेत. अनेक वेळा अधिकार्‍यांच्या दडपणामुळे गोरगरीब नागरिक बोलू शकत नाहीत, मात्र या बैठकीत नागरिक आता अघडपणे बोलू लागले आहेत. महसूल विभागाच्या तक्रारी गंभीर आहेत. त्यांनी यामध्ये सुधारणा करावी अन्यथा अनेकांना निलंबित करावे लागले असा इशाराही त्यांनी दिला.

महसूल विभागाचा तक्रारींचा पाढा
खासदार आपल्या दारी ही संकलप्ना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यात राबविण्यास सुरवात केली आहे. त्याची सुरुवात काल तालुक्यातील निमगाव गांगर्डे या गावापासून केली असून समारोप चापंडगाव येथे करण्यात आला. या वेळी सर्वत्र नागरिकांनी महसूल विभागाच्या विषयी तक्रारींचा पाउस पाडला. महसूल विभागाच्या अनांगोदी कारभार पाहून खासदार श्री. विखे यांनी देखील यावेळी डोक्याला हात लावता आणि असा कारभार आणि असे कर्मचारी व आधिकारी राहतात? मतदारसंघामध्ये असते तर आत्ता पर्यत नोकरी सोडून ते घरी बसले असते. कर्जत तालुक्यातील महसूलचे आधिकारी आणि कर्मचारी यांना काम कसे करावे जनतेची आपण काही बांधलिकी लागतो याचा विसर पडलेला दिसतो. कोणतीच शिस्त आणि धाक यांना राहिलेला नाही. कामगार तलाठी जर कसलेच काम पैसे घेतल्या शिवाय करीत नसले तर ही आतिशय गंभीर बाब आहे असे उदगार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काढले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *