मोलमजुरी करणार्‍या शेतमजुराने वीष पिऊन जीवनयात्रा संपविली
Featured

मोलमजुरी करणार्‍या शेतमजुराने वीष पिऊन जीवनयात्रा संपविली

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – मोलमजुरी करून उपजीविका करणार्‍या तरुणाने विष प्राशन करून आत्महतत्या केली. श्रीगोंदा फॅक्टरी येथे हा प्रकार घडला. एका खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. अद्याप तसा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

दत्ता गणपत सुतार (वय- 35, रा. श्रीगोंदा फॅक्टरी) हा तरुण श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात विविध ठिकाणी मोलमजुरी करून उपजीविका करत होता. काही खासगी सावकारांकडून त्याने आठवड्याला 10 टक्के या दराने कर्ज घेतले होते. अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते वेळेवर फेडता येत नव्हते. सतत सावकार दारात येऊन मारहाणीची धमकी देऊन शिवीगाळ करत असत.

या प्रकाराने काही दिवस तो तणावात होता. सावकारांचा त्रास असह्य झाल्याने त्याने बुधवार दि. 5 रोजी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीन उपचारासाठीे त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार चालू असतानाच शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पाठीमागे पत्नी, नऊ वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com