राहाता – मालवाहू ट्रकचा भिषण अपघात, चालक ठार

राहाता – मालवाहू ट्रकचा भिषण अपघात, चालक ठार

अस्तगांव (वार्ताहर) – नगर मनमाड महामार्गावर पिंपळस हद्दीत दोन मालवाहू ट्रकचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाला आहे. राहता कोर्टापासून काही अंतरावर महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणा-या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भिषण होती की उभा असलेला ट्रक थेट दुभाजकावर चढला आणि धडक देणा-या राजस्थानच्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला.

आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. कॅबीनचा चक्काचुर झाल्याने ट्रक ड्राव्हरचा मृतदेह काढण्यास पोलिसांना तीन तास प्रयत्न करावे लागले आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com