नगर – जिल्ह्यात पुन्हा सहा पॉझिटिव्ह
Featured

नगर – जिल्ह्यात पुन्हा सहा पॉझिटिव्ह

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) –एका दिवसाच्या गॅपनंतर नगर जिल्ह्यात आज मंगळवारी पुन्हा सहा जणांना कोरोनाची लागन झाली आहे. जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २२३ इतका झाला आहे.

संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली असून मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला व ५२ वर्षीय व्यक्तीला तर पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती, यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. राहाता तालुक्यातील दोघेजण कोरोना बाधित असून निमगाव निघोज येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर राहाता शहरातील बोठे गल्ली येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आहे. नगर शहरातील पाचपीर चावडी माळीवाडा येथील एकूण ६९ वर्षीय व्यक्ती बाधित असून यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे.

दरम्यान आज अकोले, संगमनेर व शेवगाव येथील प्रत्येकी एक तर केडगावच्या दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com