Friday, April 26, 2024
Homeनगरसैनिकी शाळांमधील पाचवीचा वर्ग पुढील वर्षापासून होणार बंद

सैनिकी शाळांमधील पाचवीचा वर्ग पुढील वर्षापासून होणार बंद

संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांमधील पाचवीचे प्रवेश यावर्षी दिले जाणार नसल्याचे आदेश शासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे सैनिकी शाळेतील पाचवीचा वर्ग कायमस्वरूपी बंद होणार आहेत.

राज्यात 1995 पासून खाजगी अनुदानित सैनिकी शाळांना मान्यता देण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यात इयत्ता पाचवी ते दहावी, बारावी अशा स्वरूपाची रचना सैनिकी शाळांची आहे. या सैनिकी शाळांमध्ये गेले अनेक वर्ष इयत्ता पाचवी पासून प्रवेश देण्यात येत होते. तथापि देशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी 2010 पासून सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

या कायद्यातील तरतुदी लक्षात घेता इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग हे कनिष्ठ प्राथमिक असून, इयत्ता सहावी ते आठवी चे वर्ग उच्च प्राथमिक नववी ते दहावी माध्यमिक व अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक अशी रचना मान्य करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदी लक्षात घेता यापुढच्या कालावधीत अनुदानित सैनिकी स्कूलमध्ये सहावीपासून प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शैक्षणिक वर्ष 2020/21 या वर्षात पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे सैनिकी स्कूल मधील पाचवीचे वर्ग कायमस्वरूपी बंद होणार आहेत.हे वर्ग बंद झाले असले तरी तेथील कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन शासन करणार आहे. या शिक्षकांना सध्या कोणत्याही स्वरूपाचे काम नसले तरी त्यांचे वेतन देण्याचे शासनाने सुचित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या