झेडपी सोसायटी निवडणूक सोशल मीडियावर व्हायरल
Featured

झेडपी सोसायटी निवडणूक सोशल मीडियावर व्हायरल

Sarvmat Digital

आज अंतिम मतदारयादी होणार प्रसिद

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसाठी जिल्हा परिषद निवडणुकीपेक्षा जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय ठरलेल्या कर्मचारी सोसायटीची अंतिम मतदारयादी मंगळवारी प्रसिध्द होणार आहे. मात्र, यापूर्वी ही निवडणूक सोशल मीडियावर व्हायरल झाली असून कर्मचार्‍याच्या वॉट्सअ‍ॅप गु्रपवर निवडणूक या एक मात्र विषयावर चर्चा झडत आहे.

जि.प. कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल 100 कोटींपेक्षा जास्त आहे. पगारदार संस्था असल्याने थकबाकीचा विषय नाही. या ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांच्या संघटनांमध्ये चढाओढ असते. गेल्या वर्षी या ठिकाणी दोन मंडळांत सरळ लढत झाली होती. यंदा मात्र, परिस्थिती वेगळी असून तीन अथवा त्यापेक्षा जास्त मंडळ निवडणुकीत दंड थोपटण्याच्या तयारीत आहे. यामुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे.

जिल्हा परिषद सोसायटीची आज अंतिम मतदार प्रसिध्द झाल्यानंतर येणार्‍या आठ दिवसात कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांमधील राजकारणच चांगलेच पेटले आहे. सध्या कार्यालयात, जिल्हा परिषदेच्या आवार, कॅटींन आणि सोशल मीडियावर कर्मचार्‍यांचा सोसायटी निवडणूक आणि उमेदवारी हाच एकमात्र विषय चर्चेचा आहे. यावरून कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीवरून किती आक्रमक आहेत, हे दिसत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com