Friday, April 26, 2024
Homeनगरलेखी प्रतिपादन सभेत चार विषयांना सदस्यांकडून शंभर टक्के मंजूरी

लेखी प्रतिपादन सभेत चार विषयांना सदस्यांकडून शंभर टक्के मंजूरी

जिल्हा परिषद : 10 काही विषयांवर काही सदस्यांच्या हरकती

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याऐवजी लेखी प्रतिपादन सभा घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेवरील चौदा विषय ठेवण्यात आले होते. त्यातील सर्व विषय मंजूर करण्यात आलेले असून चार विषयांना 100 टक्के मंजुरीसाठी मते पडलेली आहेत. तर उर्वरित 10 विषयांना 75 ते 99 टक्क्कांपर्यंत मतदान झाले असले तरी काही सदस्यांनी त्यावर हरकत घेत, त्यांचा अमान्य असा शेरा नोंदविला आहे.

- Advertisement -

करोना विषाणूमुळे जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकी सभा झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी अंदाजपत्रक मंजूर करून घेतले. त्यानंतरही करोनाचे संकट कायमच असल्यामुळे सभा घेणे शक्य नसल्याने तसेच कामे मंजूर होणे गरजेचे असल्यामुळे लेखी प्रतिपादन सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ही सभा घेण्यात आली. ही सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या सभेत श्रीरामपूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा स्वीकृतीस मंजुरी देणे, 64 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील शासकीय रुग्ण वाहिकेवर कंत्राटी वाहन चालक सेवा पुरविण्याच्या 40 लाख 80 हजाराच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देणे, शेवगाव-पाथर्डीतील पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चास मंजुरी देणे आदी विषय सभेत ठेवण्यात आले होते.

या सर्व विषयांची विषय पत्रिका सदस्यांना पाठवून त्यावर मान्य व अमान्य अशी मते सदस्यांकडून मागविण्यात आली होती. त्यामध्ये फक्त चार विषयांना बहुमताने सदस्यांनी मान्यता दिलेली असून उर्वरित काही विषयांवर काहींनी अमान्य तर काहींनी कोणतेच मत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे सर्व विषयांचा मंजुरीचा आकडा 100 टक्के होऊ शकला नसला तरी 75 ते 99 टक्केपर्यंत त्याला मते पडल्याने सर्व विषय मंजूर झालेले आहेत.

जिल्हा परिषदेची सभा असल्यामुळे टाकळी खातगाव (ता. नगर) येथील पाणी पुरवठा योजनेचेकामाबाबतचा विषय सदस्यांनी सभेत चर्चेला घ्यावा, असे मत पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. त्यावर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या