ठाण्यातून आलेली ती महिला पॉझिटिव्ह; महिलेसह तिघांना नगरला केले क्वारंटाईन
Featured

ठाण्यातून आलेली ती महिला पॉझिटिव्ह; महिलेसह तिघांना नगरला केले क्वारंटाईन

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – तालक्यातील दौंड नगर महामार्गालगत असलेल्या गावात कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस सोमवारी नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. सदर महिला पतीसोबत ठाणे येथे राहत होती. तिच्या पतीचे कोरोनाने ८ मे रोजी निधन झाले. या महिलेची ठाण्यात तपासणी करण्यात आली होती. पण वैद्यकीय अहवाल येण्याअगोदरच ती गावात आली होती. ती त्यांच्या मळ्यात मुलगा व सुनेबरोबर राहीली. या महिलेचा वैद्यकीय अहवाल ठाणे प्रशासनाने अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आहे.

या महिलेसह तिच्या मुलगा व सुनेला नगरला क्वारंटाईन कण्यासाठी पाठविण्यात आले आहे. गावात या तीन व्यक्तीच्या संपर्कात कोणीच आलेले नाही ही समाधानाची बाब आहे. पण तहसीलदार महेंद्र महाजन व आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी याबाबत आढावा घेतला असून कोरोनाबाधित महिलेच्या घराच्या परिसरात गावात औषध फवारणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी ग्रामस्थांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com