धूम स्टाईलने महिलेचे दोन लाख पळविले
Featured

धूम स्टाईलने महिलेचे दोन लाख पळविले

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – बँकेतून काढलेली दोन लाख रोकड घेऊन जाणर्‍या महिलेची पर्स चोरट्यांनी भरदिवसा लंपास केली. आनंदधाम रोड परिसरातील टिपटॉप दुकानासमोर शुक्रवारी (दि.07) दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मंगल प्रविणचंद पिपाडा (रा. सुपा) यांनी फिर्याद दिली आहे.

सुपा येथील मंगल पिपाडा शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मर्चंट बॅकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी बॅकेतून सुमारे दोन लाख रूपयांची कॅश काढली. ती कॅश पर्समध्ये ठेवून त्या सुपा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. आनंदधाम रोडवरून जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पिपाडा यांच्या हातला हिसका देत पर्स घेऊन पसार झाले. या प्रकरणी पिपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना धोत्रे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com