वाईनच्या टेम्पोने दोन महिलांना चिरडले
Featured

वाईनच्या टेम्पोने दोन महिलांना चिरडले

Sarvmat Digital

मृत महिला सूतगिरणी परिसरातील । श्रीरामपुरातील गोंधवणीची घटना

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोंधवणी परिसरामध्ये शेतात काम करून घरी जाणार्‍या दोन महिलांना वाईनची वाहतूक करणार्‍या आयशर टेम्पोने चिरडले. या आपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी महिला रुग्णालयात मरण पावली.

अर्चना मंगेश तिडके (वय 40) व रंजना गोरक्षनाथ सरोदे (वय 42) असे या आपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील सूतगिरणी परिसरातील शेतमजुरी करणार्‍या दोन महिला शेतकाम करुन सुट्टी होऊन घरी चालल्या होत्या. गोंधवणी परिसरातील फरगडे वस्ती वरील मारुती मंदीर समोरील वळणावर आयशर टेम्पो (क्र.एमएच-17 बीडी 0015) या टेम्पो वरील चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेने चाललेल्या महिलांना पाठीमागून जोराची धडक दिली.

टेम्पोचे पुढील टायर अर्चना तिडके या महिलेच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. तर रंजना गोरक्षनाथ सरोदे गंभीर ही महिला गंभीर जखमी झाली. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमी महिलेस शहरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे यांनी पोलिसांना खबर देताच ते घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या रोडवर सतत छोटे मोठे आपघात होत असतात. या रस्त्यावर लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते. तसेच रात्री बेरात्री वाळु वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होत असते. या वाहतुकीचा प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com