Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशकोरोना – व्हॉट्स अँपने केले स्टेटस फिचर मध्ये बदल.!

कोरोना – व्हॉट्स अँपने केले स्टेटस फिचर मध्ये बदल.!

दिल्ली – सध्या कोरोनामुळे देशामध्ये २१ दिवसांची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. नागरिक घरात बसून असल्यामुळे इंटरनेटचा व सोशल साईटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच व्हॉट्स अॅपने सर्व्हरवरील लोड कमी करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं भारतात बदल केला आहे.

आता व्हॉट्सअॅप युझर्सना स्टेटसवर मोठे व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. कंपनीने आता व्हिडीओ शेअर करण्यासाठी व्हिडिओची मर्यादा ३० सेकंदावरून १५ सेकंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक कोरोना बद्दल व्हिडिओ व माहिती शेअर करत असल्यामुळे व्हॉट्स कंपनीच्या सर्व्हरवर प्रचंड लोड पडत आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या