ओढ्यात आढळले 30 मृत सर्प
Featured

ओढ्यात आढळले 30 मृत सर्प

Sarvmat Digital

वडाळा महादेव परिसरातील घटना; जाळे लावणार्‍याचा शोध सुरू

वडाळा महादेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील महादेव देवस्थान परिसरातील पांदन क्षेत्रामधील ओढ्यातील पाण्यावर धामण जातीचे 25 ते 30 मृत सर्प तरंगताना आढळून आले. अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकल्याने या सर्पाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.पाण्यात जाळे लावणार्‍या अज्ञात व्यक्तीचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

वडाळा महादेव येथे स्मशाभूमीजवळील पांदन क्षेत्रातील ओढ्यामध्ये मासे पकडण्यासाठी जाळे लावण्यात आले होते. मात्र यामध्ये धामण जातीचे 6 ते 7 फुट लांबीचे सर्प अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. परिसरात दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. ही बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली. येथील ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल विकास पवार यांना घटनेची माहिती दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com