Friday, April 26, 2024
Homeनगरविळदच्या मतदारयादी प्रश्नी प्रशासनाने झटकले हात

विळदच्या मतदारयादी प्रश्नी प्रशासनाने झटकले हात

हरकती न आल्याने सदोष यादीद्वारेच होणार मतदान

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील विळद येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील चुकीच्या यादी प्रश्नी कोणाचीही प्रारूप मतदार यादी कार्यक्रमात कोणाची हरकत न आल्याने आता ज्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहे. विहित मुदतीत कोणीही हरकत न घेतल्यामुळे यासंदर्भात प्रशासनाने हात झटकले आहेत.

- Advertisement -

नगर तालुक्यातील विळद ग्रामपंचायीचा निवडणूक कार्यक्रम 24 फेब्रुवारीला जाहीर झाला असून 29 मार्चला मतदान होणार आहे. ग्रामपंचायतिच्या प्रभाग क्रमांक चारच्या अंतिम यादीत 335 पुरुष मतदार तर 328 स्त्री मतदार असे एकूण 635 मतदारांची नावे आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीत सात मतदारांना वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आले असून त्यापैकी एका मतदाराला तीन अनुक्रमांक देण्यात आले आहेत. यासह मृत मतदारांची नावेही प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीत छापण्यात आली आहेत.

वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या विहित मुदतीत हरकती न नोंदवल्या गेल्यामुळे चुकीच्या याद्यातच मतदान घेण्याची वेळ ओढवली आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेतली असता वेळोवेळी दिलेल्या विहित मुदतीत कुणीही हरकत न घेतल्यास कारवाई करता येत नसल्याचे सांगत प्रशासनाने हात वर केले आहेत.

दरम्यान जनतेतून थेट सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडी सरकारने सदस्यातून सरपंच निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार विळद येथे 11 जागांसाठी 29 मार्चला मतदान होणार आहे. मात्र सदोष मतदार यादी घेऊन निवडणूक घेतली तर भविष्यात अनेक न्यायालयीन प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. अंतिम याद्या फायनल झाल्यानंतर त्याला तूर्तास तरी काही उपाय नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात अगोदर वॉर्डरचना फायनल करतो. त्यासंदर्भात हरकती घेतल्या जातात. यानंतर वॉर्ड फायनल होतो. त्यावॉर्ड मधील लोकांची यादी प्रसिद्ध केली जाते, त्या यादीवर कुणाच्या हरकती असतील तर त्या घेतल्या जातात. त्यावर चौकशी होते व नंतर यादी फायनल होते. दिलेल्या विहित वेळेत कोणी आक्षेप घेतला असेल तर निश्चित त्यावर निर्णय घेतला जातो; परंतु यादी फायनल झाल्यानंतर त्याला तूर्तास तरी काही उपाय नसतो.
– तहसीलदार, उमेश पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या