विधानसभा उपाध्यक्ष पदाकरीता आ.श्री नरहरी झिरवाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल 
Featured

विधानसभा उपाध्यक्ष पदाकरीता आ.श्री नरहरी झिरवाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Sarvmat Digital

खेडगाव (वार्ताहर) – विधानसभा उपाध्यक्षपदासाठी आमदार नरहरी झिरवाळ यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. ना. छगनराव भुजबळ, ना. एकनाथ शिंदे, ना. जयंत पाटील, आ. सरोज अहिरे, नितीन पवार, आशुतोष काळे आदींच्या उपस्थिती आमदार झिरवाळ यांनी विधानसभा उपाध्यक्ष पदाकरीता नामांकन अर्ज दाखल केला.
विधानसभा उपाध्यक्ष पदाकरीता दिनांक १२ रोजी कार्यक्रम जाहीर झालेले असून १३ मार्च दुपारी १२  वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दिनांक १४ मार्च सायं ४ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. जर मतदानाची आवश्यकता असेल तर त्याचदिवशी सायं ६:३० ते ८:३० यावेळेत मतदान आणि निकाल असा कार्यक्रम आहे.
Deshdoot
www.deshdoot.com