नगर – भिंगारमध्ये भरलेला बाजार पोलिसांनी उठविला
Featured

नगर – भिंगारमध्ये भरलेला बाजार पोलिसांनी उठविला

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने जमावबंदी आदेश जारी केला आहे. भाजी बाजर भरण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही भिंगार मध्ये आज सकाळी बंदी आदेश झुगारून भाजी बाजार भरला होता. परंतु भिंगार पोलिसांनी काही वेळात हा बाजार उठविला. दरम्यान भाजी बाजार भरवल्याप्रकरणी कोणावरही गुन्हे दाखल केलेले नाही.

भिंगार शहरात राम मंदिर परिसरात नेहमी भाजी बाजार भरत असतो. आज सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास 20 ते 25 भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करण्यासाठी गर्दी केली. भाजी खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याची माहिती भिंगार पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील फौजफाटा घेऊन दाखल झाले. पोलिसांनी हा बाजार उधळून लावला. दरम्यान, याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून, त्या परिसरात बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com