14 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार
Featured

14 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Sarvmat Digital

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्याण रोडवरील लोंढे मळा परिसरात समोसे विक्री करणार्‍या 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर नराधमाने चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करत त्याच्या छाती व पोटाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील केडगाव देवी मंदिर रोडवर शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यात संबंधधित मुलगा गंभीर जखमी आहे.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात बालकांचे लैगिंग अत्याचारापासून संरक्षण कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगा शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे लोंढे मळा येथे समोसे विक्री करत होता़ यावेळी त्याच्याजवळ एक 35 ते 40 वय असलेला व्यक्ती आला. मला 100 रुपयांचे समोसे विकत घ्यायचे आहेत, असे म्हणत तो त्या मुलास त्याच्याबरोबर केडगाव देवी मंदिर रोडने निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे चाकुचा धाक दाखवून त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

तसेच मुलाच्या छाती व पोटाला चावा घेतला़ या प्रकरणी जखमी मुलाने दिलेल्या जबाबावरून भादवी 377 आणि बालकांचे लैगिंग अत्याचारापासून संरक्षण कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अल्पवयीन मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरिक्षक नितीन रणदिवे तपास करत आहेत़

Deshdoot
www.deshdoot.com