Wednesday, April 24, 2024
Homeनगरउक्कलगाव, ममदापूरमध्ये दोन बिबटे जेरबंद

उक्कलगाव, ममदापूरमध्ये दोन बिबटे जेरबंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– तालुक्यातील उक्कलगाव येथे नरभक्षक बिबट्या तर राहाता तालुक्यातील ममदापूर परिसरात पिंजर्‍यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. उक्कलगाव येथील धनवाटरोडवरील भारत व ईश्वर जगधने यांच्या शेतात रात्री उशिरा नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला तर ममदापूर येथे चारी नंबर चार परिसरात दत्तात्रय म्हसे यांच्या शेतात ऊस तोड चालू असताना बिबट्याचे बछडे आढळून आले. त्यामुळे ऊस तोड मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

या घटनेची माहिती अमोल म्हसे यांनी तत्काळ वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. एम. जाधव यांना दिली. त्यावर वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी येथील दमाजी गाडेकर यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला.पिंजर्‍यात बछडे ठेवले.

- Advertisement -

त्यादिवशी वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या मादी बछड्यासाठी पिंजर्‍याजवळ आली असता पिंजर्‍यामध्ये अडकली. याठिकाणी कॅमेरे लावलेले असल्याने पिंजर्‍यामध्ये बिबट्या मादी जेरबंद झाल्याचे लक्षात आले. नंतर उपस्थित वनविभागाच्या अधिकार्‍यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती उपवन संरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी यांना दिली. जेरबंद झालेल्या बिबट्या व बछडे यांचे स्थलांतर राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील नर्सरीत करण्यात आले.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आर. जी. देवखिळे, वनपरिमंडळ अधिकारी सुर्यवंशी, वनरक्षक बी.एस. गाढे, आजिनाथ भोसले, संदीप कराळे, वानखेडे, वन रखवालदार सुरासे यांच्या सह इतर वन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय म्हसे, अशोक म्हसे, किशोर म्हसे, गंगाधर म्हसे, मारुती म्हसे, दमाजी गाडेकर, वाल्मिक म्हसे, कोमल गिरमे, सुरेश म्हसे, दीपक म्हसे, सतीश म्हसे, विजय म्हसे, अशोक तात्या म्हसे, प्रवीण म्हसे, धनंजय म्हसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या