आनंदी रहा, आशिर्वाद द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
Featured

आनंदी रहा, आशिर्वाद द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Sarvmat Digital

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरकरांशी साधला थेट संवाद 

अहमदनगर (प्रतिनिधी) – महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतील पहिला संवाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरच्या शेतकर्‍यांशी साधला. ‘आनंदी रहा, आशिर्वाद असू द्या’ असे सांगत ठाकरे यांनी अधिकार्‍यांना उपकाराची भावना न ठेवता शेतकर्‍यांचे आशिर्वाद घेण्याचे आवाहन केले.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केली. राज्यातील परभणी, अमरावती आणि नगर अशा तीन जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने थेट संवाद साधला.

नगर जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी आज जाहीर झाली. ब्राह्मणी आणि जखणगाव या दोन गावांतील शेतकर्‍यांचे प्रमाणिकरण करण्याचे काम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील ब्राम्हणीचे शेतकरी पोपट मोकाटेयांच्याशी ठाकरे यांनी थेट संवाद साधला.
अधिकार्‍यांनाही ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. डोेके शांत ठेवून काम करा, शेतकर्‍यांना दुखवू नका.

कर्जमाफी देताना उपकाराची भावना ठेवू नका, त्यांचे आशिर्वाद घेण्याच्या भावनाने काम करा असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकार्‍यांना दिला. विभागीय आयुक्त राजाराम माने हे खास नगरमध्ये आले होते.

कर्जमाफी आकड्यात

जिल्ह्यातील पात्र शेतकरी        – 258000
कर्जमाफीची रक्कम              – 2296 कोटी
जखणगावातील पात्र शेतकरी  – 279
ब्राम्हणीतील शेतकरी             – 972

Deshdoot
www.deshdoot.com