Featured

संगमनेरात आणखी दोन करोना बाधीत

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरातील मोमीनपुरा व भारतनगर येथे प्रत्येकी एक असे दोन करोना बाधीत रुग्ण आज आढळून आल्याने संगमनेरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात करोनाने शिरकाव केल्याने करोना बाधीतांची संख्या 34 वर पोहचली आहे. प्रशासनाने तातडीने सदर परिसर सील केला आहे. तर मोमीनपुरा येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील 10 व्यक्तींना नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

संगमनेरात सलग चौथ्या दिवशी करोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. भारतनगर, रहेमतनगर, मदिनानगर, नाईकवाडपुरा, इस्लामपुरा, कुरणरोड त्यापाठोपाठ आता मोमीनपुरा येथेही करोना रुग्ण आढळून आला आहे. मोमीनपुरा भागात राहणार्‍या 71 वर्षीय वृद्धाला करोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीबरोबरच भारतनगरमधील 33 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेरकरांची चिंता आता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य पथकही तातडीने दाखल झाले. सदर परिसर सील करण्यात आला आहे. करोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील 10 व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासणीसाठी नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com