श्रीरामपुरात आदिवासी, भटके विमुुक्तांचा मोर्चा

सीएए आणि एनआरसी विधेयके रद्द करण्याची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या सीएए आणि एनआरसी, एनपीआर या विधेयकांच्या विरोधात संविधान बचाव समितीच्या वतीने आदिवासी, भटके-विमुक्त, भूमिहीन शेतमजूर यांनी तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

सीएए आणि एनआरसी विधेयके रद्द करण्यात यावीत या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आदिवासी, भटके-विमुक्त, भूमिहीन शेतमजूर यांच्यासह अन्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाला रेल्वे स्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. मोर्चात आदिवासी, भटके-विमुक्त, जाती जमातीच्या लोकांनी आपापल्या पारंपरिक वेषभूषेत येऊन लोककला सादर करत मोर्चा मेन रोड, शिवाजी रोड, वॉर्ड नंबर 2 मार्गे मुख्य प्रशासकीय इमारत येथे मोर्चा दाखल झाला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी कॉ. राजेंद्र बावके म्हणाले की, आदिवासींच्या कायद्यांमध्ये बदल करण्याचे घटत आहे. त्यामुळे जंगलावरील आदिवासींच्या हक्कावर गदा येणार आहे. पुढील काळातही आदिवासींच्या विरोधात कायदे होणार आहेत. एनआरसी, एनपीआर ही विधेयके आदिवासींच्या विरुद्धच आहेत, असे सांगून सरकारने देश विकायला काढला आहे, असा आरोप त्यांनी केला.

आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे प्रकाश पवार म्हणाले, केंद्र सरकार आदिवासींच्या हक्कांवर गदा आणत आहे. जोपर्यंत सामान्य जनतेच्या विरोधातील कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी दिशा शेख म्हणाल्या, आजही देशाचे अनेक नागरिक अशिक्षित आहेत. अशा परिस्थितीत सरकार त्यांना पन्नास-साठ वर्षांपूर्वीचे दाखले आणायला सांगत आहे. सरकारला सर्वसामान्य नागरिकांना कायम रांगेत उभे करायचे आहे. शेतकरी, बेरोजगार यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नांवरून जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी केंद्र सरकार नको ते मुद्दे पुढे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी नागेश सावंत, जीवन सुरुडे, प्रताप देवरे, जालिंदर घिगे, मदिना शेख यांची भाषणे झाली. यावेळी दिपाली ससाणे, अंकुश कानडे, हेमंत ओगले, डॉ. सुधीर क्षीरसागर, नगरसेवक राजेंद्र पवार, अल्तमेश पटेल, तोरणे, मुख्तारभाई शहा, अहमद जहागीरदार, बाळासाहेब सुरुडे, तिलक डुंगरवाल, संदीप वाघमारे, ज्ञानेश्वर भंगड, प्रकाश पवार, रणजित माळी, विठ्ठल माळी, सुनील मोरे, सुदाम मोरे, हरिश्चंद्र पवार, भागवत बेळे, भाऊसाहेब खरुसे, लहानू शिंदे, सोमनाथ माळी, परसराम माळी, अलका माळी, यमुना रेलकर, उत्तम माळी, अरुण बर्डे,

आसरू बर्डे, भरत जाधव, लता माळी, अमोल सोनवणे, भीमराज पठारे, प्रकाश भांड, अनिल बोरसे, ताराबाई बर्डे, भिका गोलवड, हसन शेख, ज्ञानेश्वर जाधव, नानाभाऊ तारडे, वच्छला बर्डे, संदीप कोकाटे, कुमार भिंगारदिवे, फैयाज इनामदार, परिगा सोनवणे, राहुल इंगवले, कुसुम पवार, रामेश्वर जाधव, विठ्ठल माळी, अ‍ॅड. समीन बागवान, नईम शेख, फिरोज खान, शरीफ शेख, फिरोज शेख, तोफिक शेख, नदीम तांबोळी, जोयेब जमादार, रियाज पठाण, अमरप्रीत सेठी, के. सी. शेळके यांच्यासह नगरसेवक, संविधान बचाव समितीचे सदस्य आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक दिवे यांनी केले. शरद संसारे यांनी आभार मानले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *