Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर…चोरांनी ठोकली धूम

…चोरांनी ठोकली धूम

अहमदनगर (प्रतिनिधी) – शस्त्र, दांडके आणि गलोल हातात असलेले चोर सावज शोधत असतानाच अगोदरच सावध असलेल्या नागरिकांच्या नजरेस पडले. फोनाफोनी करत सायरनचा आवाज झाला नि 60-70 जणांचा घोळका जमा झाला. त्यांनी चोरांचा पाठलाग सुरू केला, पण चोरट्यांनी काटेरी झुडपातून रेल्वेपटरी ओलांडून धूम ठोकली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी फसली. काल शुक्रवारी रात्री कल्याण रोड परिसरात विद्या कॉलनीत ही घटना घडली.

कल्याण रोड परिसरातील हॅपी थॉट, पावन म्हसोबानगर, समतानगर, विद्या कॉलनीत हातात शस्त्रास्त्र,गलोल, दांडके घेऊन चोरीच्या उद्देशाने पाच ते सहा चोरटे आल्याची चाहूल प्रदीप साळवे डॉ. अच्युत घुमरे, अमोल शिंदे यांना लागली. त्यांनी खातरजमा केल्यानंतर पारूनाथ ढोकळे यांना फोन करत माहिती दिली.

- Advertisement -

त्यानंतर भगवान काटे, देवराम ढगे मेजर, भास्कर दावभट, गणेश गाडगे, ऋषीकेश लखापती, एकनाथ व्यवहारे यांना फोन करत त्यांनी घरातील सायरन वाजविला. काही क्षणात साठ ते सत्तर नागरीक चोरांना पकडण्यासाठी काठ्या बाहेर जमले.

चोर पुढे अन् नागरिक मागे असा पाठशिवणीचा खेळ पहाटे तीन वाजेपर्यत सुरू होता. काटेरी झुडपाचा व अंधाराचा फायदा घेत चोरटे रेल्वेपटरी पार करण्यात यशस्वी झाले. नागरिकाच्या एकजुटीमुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा प्लॅन अयशस्वी झाला. नागरिकानी एकत्र राहून संकटाचा सामना करण्याचे अवाहन यावेळी करण्यात आले.

अनोळखींवर नजर
परिसरात येणार्‍या फेरीवाले, अनोळखी व्यक्तीवर नगारिकांनी बारकाईने नजर ठेवावी. त्याची चौकशी करून प्रसंगी त्याचा फोटोही काढावा. फेरीवाल्यांकडून कुठल्याही वस्तू घेऊ नये, असे आवाहन पोलीसांच्या वतीने सागण्यात आले. शक्य असेल तेथे सीसीटिही कॅमेरे आणि सायरन बसवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या