चोरट्यांची ‘सौराज’मध्ये हातसफाई
Featured

चोरट्यांची ‘सौराज’मध्ये हातसफाई

Sarvmat Digital

रोकड अन् मोबाईल लंपास

अहमदनगर (प्रतिनिधी) – मार्केट यार्ड परिसरात असणार्‍या बेकरीत चोरट्यांनी हातसफाई केली. दुकानातील 30 हजार रोकड व 25 हजार रूपयांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. मार्केट यार्ड परिसरातील सौराज बेकरी पॉईंंट येथे सोमवारी (दि.10) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी सलीम अलीम अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे.

मार्केट यार्ड पसिरात अन्सारी यांच्या मालकीची सौराज बेकरी आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे ते बेकरी बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बेकरीच्या उजव्या बाजूला असलेला पत्रा कटावणीच्या सहाय्याने उचकटला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत आपला मोर्चा काऊटंरकडे वळविला. गल्ल्यात ठेवलेले 30 हजार रूपयांची रोकड व 25 हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अन्सारी यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. चव्हाण करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com