Friday, April 26, 2024
Homeनगर1744 परीक्षार्थीची टीईटीला दांडी

1744 परीक्षार्थीची टीईटीला दांडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरमध्ये रविवारी 13 हजार 808 परिक्षार्थींनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यातील पेपर क्रमांक 1 साठी 8 हजार 27 तर पेपर 2 साठी 7 हजार 525 परीक्षार्थी परिक्षेसाठी उपस्थित होते. 1 हजार 744 परीक्षार्थींनी दांडी मारली. परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नाही. पहिल्या पेपरसाठी 8027 परिक्षार्थींपैकी 7086 परिक्षार्थी उपस्थित होते. 941 जण अनुपस्थित राहिले.

दुसर्‍या पेपरसाठी 7525 परिक्षार्थींपैकी 6722 परिक्षार्थी उपस्थित होते. दुसर्‍या पेपरला 803 जण अनुपस्थित राहिले. टीईटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येत असते. इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी या वर्गासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडले, सर्व माध्यमाच्या अनुदानित/ विनानुदानित, कायम विनानुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

- Advertisement -

उमेदवारांना परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरावे लागले. ही परीक्षा दोन भागात घेण्यात आली. त्यातील पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 दरम्यान झाला. त्या मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी प्राथमिक शिक्षण स्तर माध्यमाचा पेपर होता. दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत घेण्यात आला. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू उच्च प्राथमिक स्तर माध्यमाचा पेपर घेण्यात आला. परीक्षेसाठी 5 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या