Wednesday, April 24, 2024
Homeनगरटेम्पोमधून ऊसाच्या मोळीखाली दारूची वाहतूक; नेवाशाच्या दोघांना अटक

टेम्पोमधून ऊसाच्या मोळीखाली दारूची वाहतूक; नेवाशाच्या दोघांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – टेम्पोमध्ये ऊसाच्या मोळीखाली देशी-विदेशी कंपनीची दारू वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपोवनरोडवरील पडक्या महालाजवळ तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून 51 हजार 800 रुपये किंमतीची दारू, टेम्पो (क्र. एमएच- 14 सीपी- 9916) असा तीन लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. किरण आप्पासाहेब शिंदे (वय- 24), सतिष विठ्ठल गहाळ (वय- 32 दोघे रा. मंगळापूर ता. नेवासा) यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक अहमद इमानदार यांनी फिर्याद दिली आहे.

टेम्पोमध्ये ऊसाच्या मोळीखाली देशी- विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक सोळुंके, पोलीस नाईक वसीम पठाण, जाधव, बडे, पोलीस शिपाई शिरसाठ यांच्या पथकाने तपोवनरोडवरील पडक्या महालाजवळ सापळा लावला.

- Advertisement -

टेम्पो येताच पथकाने अडवून तपासणी केली. त्यावेळी ऊसाच्या मोळीखाली देशी- विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी टेम्पो, दारू जप्त करून दोघांना अटक केली आहे. शहर उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक एच. पी. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या