Friday, May 10, 2024
Homeनगरशिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन मंजूर

शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन मंजूर

राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व इतर अनुदानित शाळेतील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन मंजूर झाले आहेत. राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने शिक्षणाधिकारी दिलीप थोरे व वेतन अधिक्षक शर्मा यांनी 16 एप्रिलला पत्र काढले असून, मुख्यध्यापकांच्या स्वाक्षरीने वेतन शाळास्तरावरच बँकेच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

- Advertisement -

शिक्षकांना लॉकडाऊनच्या काळात वेतन मिळण्यासाठी बोडखे यांनी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक आ. अरुण जगताप, माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तात्काळ बँकेचे व्यवस्थापक वर्पे यांना सद्यस्थितीत फक्त मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने मार्च महिन्याचे वेतन देण्याचे जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना सूचित करण्याचे सांगितले. लॉकडाऊनमध्ये कोणत्याही लिपीकास जिल्हा परिषदेत स्वाक्षरीसाठी यावे लागणार नाही. सर्व शिक्षकांचे वेतन देयके शाळा स्तरावरुनच बँकेत जमा होणार आहेत.

यासंदर्भात माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोडमल, सचिव भानुदास दळवी यांनी मागणी केली होती.

या निर्णयाचे बोडखे, नाशिक विभाग प्रमुख प्रा. सुनील पंडित, ग्रामीणचे अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष शशिकांत थोरात, विनायक कचरे, सचिव तुकाराम चिक्षे, चंदकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनील सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा. श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, निलेश बांगर, नितीन म्हस्के, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, प्रदीप बोरूडे आदींनी स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या