शिक्षक बनला एसटीत बोगस लिपीक
Featured

शिक्षक बनला एसटीत बोगस लिपीक

Sarvmat Digital

पेठ (वार्ताहर) – नाशिकच्या शहर आगारात लिपीक असल्याचे एसटी महामंडळाचे बोगस ओळखपत्र बनवून गेली 6 ते 7 महिन्यापासून फुकटचा प्रवासाचा लाभ घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

पेठ तालुक्यातील करंजाळी येथील केबीएच विद्यालयात शिक्षक असणारे गायकवाड हे नाशिक येथे वास्तव्यास असतांना वेतन देयकात करंजाळी येथे मुख्यालयी राहत असल्याचे भासवुन घरभाडे व अतिदुर्गम भागासाठी असणारे लाभ बिनादिक्कत घेत असल्याचे सत्य समोर आले आहे. याबाबत मुख्याध्यापक चव्हाण यांनी सदरची बाब मान्य केली असल्याने वाहकाच्या तक्रारीवरुण म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .

Deshdoot
www.deshdoot.com