Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षक बँकेत लाखोंचा गैरव्यवहार

शिक्षक बँकेत लाखोंचा गैरव्यवहार

जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार : चौकशीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत संचालक मंडळाने संगनमताने 86 लाखांचा गैरव्यवहार केला असून, याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिक्षक नेते रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

बँकेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली. शताब्दी महोत्सवाच्या नावाखाली एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद संचालक मंडळाने केली. या तरतुदीचा संचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केला आहे. शिक्षक बँकेतील कर्मचार्‍यांना रजेचा पगार देण्याची तरतूद केली. परंतु ही रक्कम प्रत्यक्ष कर्मचार्‍यांना न देता त्यातील 50 टक्के रक्कम कर्मचार्‍यांवर दबाव टाकून संचालकांनी काढून घेतली. यामुळे बँकेचे कर्मचारी दबावाखाली आहेत. शताब्दी महोत्सवाच्या नावाखाली सभासदांना रोख स्वरूपात रक्कम भेट देणे अपेक्षित असताना संचालकांनी घड्याळ भेट देण्याचे ठरवले. यात 35 लाख रूपयांचा आर्थिक गैरव्यव्हार झाला आहे.

सहकार विभागाने बँकेवर प्रशासकाची नेमणूक करून गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी सीताराम सावंत, संतोष भोपे, रघुनाथ लबडे, संभाजी औटी, विजय काकडे, बाळासाहेब गोल्हार, अशोक कानडे, बापू लहामटे, सुखदेव मोहिते, मिलिंद पोटे, जालिंदर खाकाळ, प्रल्हाद साळुंके, माणिक जगताप, अनिल अष्टेकर, संतोष डमाळे, विठ्ठल वराळे, राजेंद्र पटेकर, राजेंद्र मरभळ यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या