सेवानिवृत्त शिक्षकाला 10 लाखांचा गंडा
Featured

सेवानिवृत्त शिक्षकाला 10 लाखांचा गंडा

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त शिक्षकाच्या बचत खात्यावरील 10 लाख 32 हजार रुपये लांबविल्याची घटना संगमनेरात घडली आहे. अज्ञात व्यक्तीने संबंधित शिक्षकाचे एटीएम कार्ड लांबवून ही रक्कम काढल्याचे शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बाबाजी लहानु राहाणे (वय 68, रा. देवगाव, ता. संगमनेर, सेवनिवृत्त शिक्षक) असे तक्रारदाराचे नाव आहे. बाबाजी राहाणे यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम कार्ड अज्ञात व्यक्तीने घरातून चोरून नेले. त्याबरोबर कार्डचे पासवर्ड देखील लबाडीने चोरून नेले. कार्ड चोरणार्‍याने देवगाव पेट्रोल पंप व संगमनेर येथील एटीएम मशीनवरून 3 सप्टेंबर 2019 ते 29 ऑक्टोबर 2019 दरम्यान 10 लाख 32 हजार रुपये बाबाजी राहाणे यांच्या खात्यावरुन काढून सदर रकमेची चोरी केली.

याबाबत बाबाजी राहाणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 41/2020 भारतीय दंड संहिता 380 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. माळी करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com