सुशांतआधीही ‘यांनी’ घेतली अशी एक्झिट

सुशांतआधीही ‘यांनी’ घेतली अशी एक्झिट

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने मुंबईत आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याने पूर्ण चित्रपट जगताला धक्का बसला आहे. या आधी आत्महत्या केलेल्या कलाकारांबद्दल माहिती घेऊयात.

सुशांत सिंह राजपूत (२१ जानेवारी १९८६ – १४ जून २०२०) – सुशांत सिंह राजपूत हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी याच्या बोयोपिक मध्ये धोनीची भूमिका साकारल्या मुळे प्रसिद्ध झाला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात दूरदर्शन मालिकांमधून केली होती. त्यानंतर स्टार प्लसची मलिका “किस देश में है मेरा दिल” ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर झी टीव्हीच्या लोकप्रिय “पवित्र रिश्ता” या मालिकेत त्याने काम केले होते. या मालिकेसाठी त्याला पुरस्कार देखील मिळाला होता.

विवेका बाबाजी (२७ मे १९७३ – २५ जून २०१०) – विवेका बाबाजी ही एक मॉरीशियन मॉडेल आणि अभिनेत्री होती होतो. १९९० च्या दशकातील कामसूत्र कंडोम जाहिराती आणि आणि १९९४ मधील कथित मनिला फिल्म फेस्टिव्हल घोटाळ्यामध्ये तिच्या सहभागासाठी ती अधिक परिचित होती.

वसंत कुमार शिवाशंकर पादुकोण (९ जुलै १९२५ – १० ऑक्टोबर १९६४) – वसंत कुमार शिवाशंकर पादुकोण हे गुरु दत्त म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय चित्रपट जगतात दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम आणि चौधविन का चांद या सारखे सुपरहिट चित्रपट बनवले. तसेच टाइम मासिकाच्या ऑल-टाइम १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत प्यासा हा चित्रपट सामील झाला.

प्रत्युषा बॅनर्जी (१० ऑगस्ट १९९१-१ एप्रिल २०१६) – बालिका वधू मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ही एक भारतीय मालिका आणि  शोमध्ये दिसली होती. तिने बिग बॉस – ७ मध्ये देखील सहभाग नोंदवला होता.

वाजपेयजुला उदय किरण (२६ जून १९८० – ५ जानेवारी २०१४) – चित्रपट जगतात उदय किरण हा एक फिल्मफेअर अवॉर्ड विजेता चित्रपट अभिनेता होता. उदय किरण याने प्रामुख्याने तेलगू चित्रपटात काम केले होते. त्याचे पहिले तीन चित्रपट चित्राम, नुव्वु नेनु आणि मानसन्था नुवे हे तमिळ चित्रपटांमध्ये यशस्वी ठरले. त्यांच्या कारकिर्दीत अख्तरण्णा कडन्ना हा चित्रपट शेवटचा चित्रपट ठरला. लागोपाठ तीन चित्रपट हिट देण्यामुळे त्याला “हॅट-ट्रिक हीरो” ही ​​पदवी मिळाली होती.

नफिसा जोसेफ (२८ मार्च १९७८ – २९ जुलै २००४) –  नफिसा जोसेफ एक भारतीय मॉडेल आणि एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होती. ती फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स १९९७ ची विजेती देखील होती.१९९७ मध्ये मियामी बीच येथे झालेल्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या पैकी ती एक होती.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com