सुपा येथे अपहरण करुन खंडणी मागितली; आरोपी फरार
Featured

सुपा येथे अपहरण करुन खंडणी मागितली; आरोपी फरार

Sarvmat Digital

सुपा पोलिस आरोपींच्या शोधात

सुपा (वार्ताहर)– सुपा येथे अपहरण करून कोयत्याचा धाक दाखवत आठ लाख रुपयाची खंडणी मागितली. अजित सुभाष थोरात वय 23 रा. पिंपरी गवळी यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,

शुक्रवार दि .14 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 10 .00 ते 10.30 चे दरम्यान सुपा बसस्थानक चौक वाळवणे रस्त्यावर आरोपी विश्वजीत रमेश कासार रा. वाळकी ता. नगर, सुनिल फक्कड आडसरे रा. शेडाळे ता.आष्टी जि. बीड, मनोज चोंबे रा .बाबुर्डी खडकी ता .नगर, अमोल खरमाळे रा. सुपा ता . व त्याचे अनओळखी इतर चार साथीदार यांनी मला जबरदस्तीने सिल्व्हर फिक्कट कलरच्या नँक्साँन मोटार कारमध्ये बसवून परिसरातीलएखा काटवनात नेले. तेथे गेल्यावर गाडीतील डिक्कीतुन कोयता काढुन मला घेराव घालत आठ लाख रुपयाची खंडणी मागत होते.

Deshdoot
www.deshdoot.com