सुनीता घुलेंना 22 लाखांचा दंड
Featured

सुनीता घुलेंना 22 लाखांचा दंड

Sarvmat Digital

कोर्टाचा आदेश । पतसंस्थेचे कर्ज प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – पतसंस्थेच्या कर्ज प्रकरणात कोर्टाने सुनीता संजय घुले यांना 22 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा तसेच तीन महिने कारवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला वरिष्ठ कोर्टात अपील करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.

कालिका नागरी पतसंस्थेने घुले यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. घुले यांनी कर्ज प्रकरणात पतसंस्थेला चेक दिला होता. मात्र तो न वटताच परत आला. त्यानंतर पतसंस्थेने कोर्टात दावा दाखल करत कर्ज व नुकसान भरपाईपोटी 22 लाखाची मागणी करणारा दावा केला. नगरच्या कोर्टात त्याची सुनावणी सुरू होती. कोर्टाने सुनीता घुले यांना 22 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तसेच तीन महिने कारवासाची शिक्षाही ठोठावली. या शिक्षेविरोधात वरिष्ठ कोर्टात अपील करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आल्याची माहिती समजली.

Deshdoot
www.deshdoot.com