नगर – तांबटकर मळ्यातील विहिरीमध्ये तरुणाची आत्महत्या
Featured

नगर – तांबटकर मळ्यातील विहिरीमध्ये तरुणाची आत्महत्या

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – गुलमोहर रोडवरील तांबटकर मळा या ठिकाणी गुरुवारी (दि. 7) दुपारी चारच्या सुमारास एका तरुणाने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. शकील सज्जन शेख (रा. तांबटकर मळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी त्याने अंगावरील कपडे व मोबाईल काढून ठेवला होता. त्या कपड्यात एक चिठ्ठी मिळून आली आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये अशा आशेचा मजकूर त्या चिठ्ठीमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सावेडीतील तांबटकर मळ्यात एक खाजगी विहीर आहे. विहीर आकाराने मोठी व पाण्याने पूर्ण भरलेली आहे. गुरुवारी शेख याने अंगातील कपडे काढून विहीरत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक हरुण मुलाणी, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक सोळुंके घटनास्थळी दाखल झाले. महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. शेख यांचा शोध सुरू झाला. परंतु, विहीर मोठी व पूर्ण भरलेली असल्याने रात्री साडेदहा पर्यंत शोध कार्य सुरू असूनही शेख यांचा मृतदेह मिळून आला नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास मृतदेह मिळून आला. उत्तरदायी तपासणीसाठी मृत्यूदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या विहिरीमध्ये ही दुसरी आत्महत्या असून सावेडी मधील लोक वस्तीतील ओपन विहिरींना संरक्षण जाळी बसवण्याची मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com