Saturday, May 11, 2024
Homeनगरचक्रीवादळामुळे नगर जिल्ह्यात 2 कोटी 67 लाखांचे नुकसान

चक्रीवादळामुळे नगर जिल्ह्यात 2 कोटी 67 लाखांचे नुकसान

150 गावांना फटका, 33 टक्क्यांपेक्षा झाले अधिक नुकसान

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आठवड्यात 3 जूनला जिल्ह्यातील निगर्स चक्रीवादळामुळे राहाता, शेवगाव जामखेड आणि कर्जत तालुका वगळता उर्वरित 10 तालुक्यातील 150 गावातील 2 हजार 621 शेतकर्‍यांचे 1 हजार 549 हेक्टवरील बागायात भागातील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरकारच्या नियमानूसार पिकनिहाय मदतीची रक्कम मिळणार आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 2 कोटी 67 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात चक्रीवादळामुळे 1 हजार 286 हेक्टवर फळबागांचे तर 262 हेक्टवर बागाय पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. या पिकांना सरकारच्या नियमानूसार बागायत क्षेत्रातील पिकांना 13 हजार 500 रुपये प्रती हेक्टर तर फळपिकांना 18 हजार रुपये प्रती हेक्टरनूसार भरपाई मिळणार आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका संगमनेर तालुक्याला बसला असून तालुक्यातील 1 हजार 70 हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यात 1 हजार 623 शेतकर्‍यांचे फळबागा आणि बागायत भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पारनेर तालुक्यात 292 हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. याचा फटका 670 शेतकर्‍यांना बसला आहे. चक्रीवादळानंतर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्यावतीने संयुक्त पंचनामे करण्यात आले असून भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात वादळात बागायत भागातील ऊस, भाजीपाला आणि कांदा यासह अन्य पिकांचे 272 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाले आहेत. यामुळे 598 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. यासह 1 हजार 277 हेक्टरवरील 2 हजार 24 शेतकर्‍यांचे फळबागांचे नुकसान झाले असून यात अंबा, डाळींब यासह अन्य फळबागा यांचा समावेश आहे. आहेत.

बाधित गावे आणि कंसात भरपाईची संभाव्य रक्कम
संगमनेर 38 (1 कोटी 87), पारनेर 58 (46 लाख 66), अकोले 12 (14 लाख 72 हजार), पाथर्डी 8 (2 लाख 25 हजार), राहुरी 15 (5 लाख 26), श्रीरामपूर 3 (5 लाख 26 हजार), श्रीगोंदा 7 (1 लाख 13 हजार), कोपरगाव 3 (23 हजार), नगर 3 (40 हजार), नेवासा 3 (69 हजार), जामखेड शुन्य, राहाता शुन्य, शेवगाव शुन्य, कर्जत शुन्य.

- Advertisment -

ताज्या बातम्या